प्रती,
मा.श्री.डाँ.नितीनजी करीर साहेब,
मुख्य सचीव,गृह विभाग म.रा.मुबई
विषय…पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना 15 दिवस अर्जीत रजा रोखीकरण बंद केल्या बाबत चा निर्णय दि.21/2/24 चा रद्द करणेबाबत
महोदय,
आम्ही पोलीस परीवारातील सदस्य आहोत आपण घेतलेला शासन निर्णय दिनांक 21/2/24 आम्हाला मान्य नाही शासन निर्णयात नमुद केले आहे की सातव्या वेतन आयोगानुसार शासकीय ईतरही शासकीय कर्मचारी यांचे वेतनात भरीव वाढ झालेली आहे कामाचे स्वरुप लक्षात घेऊन पोलीसांना हि दिलेली सवलत अपवाद ठरवली आहे.
निर्णयात श्रीमानजी जर महसुल विभागाचे कर्मचारी ह्यांचे वेतना एवढी भरीव वाढ आणी शनिवार रविवार दोन दिवसाची आपण पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना सुट्टी द्यावी तेव्हाच अर्जीत रजेचे रोखीकरण करण्याची सवलत रद्द करावी.
श्रीमानजी या रोखीकरणाची रक्कम जेव्हाही पोलीसांना मिळते तेव्हा मुलांची पुस्तके कपडे गणवेश व शाळेची फि भरण्यात येते परंतु या निर्णयावरुन पोलीस परीवाराला असे लक्षात आले आहे कि शासन पोलीसांवर किंबहुना पोलीस परीवारावर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहे.
श्रीमानजी मंत्री खासदार व आमदार यांना शासना कडुन दिली जाणारी सुरक्षा काढुण टाकावी व SPU विषेश सुरक्षा पथक पोलीस दलातुन हि शाखा बंद करण्यात यावी हि विनंती.
आपला,
किशोर सुरेशराव ढोणे
संस्थापक अध्यक्ष पोलीस बाॅईज असोसिएशन म.रा.