आमच्या विषयी

पोलीस बॉईज असोसिएशनची नोंदणी, विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालय, वर्धा येथे सन 2018 साली केली असून, पोलीस बॉईज असोसिएशनचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र राज्य 0000002 / 18 / एफ – 0008872 / 18 आहे.

पोलीस परीवार यांच्या हक्कांच्या व अधिकाराच्या काही मागण्या

  • पोलीस अधिकारी व अंमलदार सेवेत असोत किंवा निवृत्त यांचे पाल्य्यांना पोलीस पाल्या म्हणून भरतीमध्ये १०% आरक्षण देण्यात यावे.
  • पोलीस भारतीसाठी ज्या पोलीस पाल्यांनि वयोमर्यादा ओलांडली आहे अशांना महाराष्ट्र सुरक्षा बल व सुरक्षा रक्षक मंडळ यामध्ये थेट भरती करून घ्यावे.
  • सेवा समान होण्याच्या १० वर्षांआधी अंमलदार व अधिकारींना सेवेतून बडतर्फ किंवा सेवानिवृत्ती दिली असेल अशांच्या पाल्य्यांना अनुकंपा दर्जा देऊन सेवेत सामावून घ्यावे.
  • पोलीस विभागाचे वेतन खाजगी बँकेतून ३० लाख रु. अपघाती विम्याची लालच देऊन काढण्यात आले ही निव्वळ फसवणूक आहे. वेतन हे भारतीय स्टेट बँकेतून करण्यात यावे.
  • शासन नि. क्र. अकंपा/१२१७ / प्र. क्र. १०२ / २०१७ मधील २१ अन्वये अंमलदार अधिकारी यांचे मृत्यू नंतर पात्र कुटुंबियांचे नाव अनुकंपा धारकाचे प्रतीक्षासूची मध्ये घेतल्यानंतर त्याचे ऐवजी अन्य पात्र वारासदाराचे नाव प्रतीक्षा सूची मध्ये घेतले जण नाही, हा शासन निर्णय रद्द करावा.
  • महाराष्ट्र कुटुंब कल्याण योजना बंद करून सुधारित नवीन विमा योजना सुरु करण्यात यावी.
  • पोलिसांच्या पगाराची केस मॅट मध्ये खारीज तसेच प्रस्ताव २०११ पासून प्रलंबित आहे. यावर तातडीने निर्णय घ्यावा, नाहीतर महसूल विभागाचा पगार पोलीस विभागाएवढा करावा.
  • सन २००५ नंतर भरती झालेले सर्व अंमलदार / अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर आजन्म पेन्शन योजना सुरु करण्यात यावी.
  • सन २०१३ व २०१६ मध्ये झालेली पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पास झालेल्या अंमलदारांना लवकरात लवकर पदोन्नती देण्यात यावी.
  • पोलीस अंमलदार / अधिकारी यांचा कर्तव्यावर असताना कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्वरित त्यांचे एका मुलाला नोकरीमध्ये सामावून घ्यावे, त्याकरिता तिसरे किंवा चौथे अपत्य चालणार नाही हि अट रद्द करावी.

पोलीस बॉईज असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) संलग्नित महिला आघाडी (पोलीस पत्नी)

२० वर्षांपासून पोलीस परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव कार्यरत.

कार्यकर्ता संख्या

1000

निवेदन

1000

मोर्च्यात सहभाग

100

पोलीस बॉईज असोसिएशन

पोलीस बॉईज असोसिएशनची नोंदणी, विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालय, वर्धा येथे सन 2018 साली केली असून, पोलीस बॉईज असोसिएशनचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र राज्य 0000002 / 18 / एफ – 0008872 / 18 आहे.